Pages

www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग ला भेट देणाऱ्या सर्व शिक्षकांचे मी श्री शंकर भालेराव सहर्ष स्वागत करीत आहे. www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग वर असणारी माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे.जर यातून कुणाच्या copyright हक्क कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कृपया मला shankarbhalerao9@gmail.com तात्काळ मेल वर कळवावे सदर पोस्ट अथवा कॉपिरराईट भाग ताबडतोब ब्लॉग वरून काढून टाकला जाईल

Sunday, February 25, 2018


♦अभिनेत्री श्रीदेवी♦

💐पद्मश्री, सुपरस्टार अभिनेत्री श्रीदेवी यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐

अतिशय धक्कादायक घटना बॉलिवूड मधील अभिनेत्री अनेक चित्रपटातून खूप सुंदर अभिनय करणाऱ्या सिनेसृष्टीत एक काळ दबादबा होता. श्रीदेवीचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला. श्रीदेवी यांचे दुबईत दु:खद निधन. त्यांना *💐 भावपूर्ण श्रद्धांजली 💐*

●जन्म :~ १३ ऑगस्ट १९६३
●मृत्यू :~ २५ फेब्रुवारी २०१८

    श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये अभिनय, सौंदर्य आणि नृत्याविष्काराने स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवला आहे. त्यांनी अभिनयाची सुरुवात लहान असतानाच सुरु केली होती.
बालकलाकार म्हणून श्रीदेवीने चित्रपटसृष्टीत पाय ठेवला होता. वयाच्या चौथ्या वर्षी तिने तमिळ चित्रपटात काम केलं होतं. १९६७ साली तिला एका मल्याळम चित्रपटातील भुमिकेसाठी केरळ सरकारने सर्वोत्कृष्ट बाल कलाकार म्हणून गौरव केला होता. १९७५ साली तिने ज्युली चित्रपटाद्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. हिंदी चित्रपटसृष्टीत तिने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांत काम केले आहे. अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल २०१३ साली भारत सरकारकडून पद्मश्री या पुरस्काराने गौरविण्यात आले होते. तिला ६ वेळा हिंदी, तमिळ, तेलुगू भाषांतील चित्रपटातील भुमिकांसाठी फिल्मफेअर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. सदमा, चांदनी, इंग्लिश विंग्लिश आणि मॉमसाठी तिला फिल्मफेअर पुरस्कार न मिळाल्याने तिच्या चाहत्यांची थोडी निराशा झाली होती. मॉम हा श्रीदेवीचा शेवटचा हिंदी चित्रपट होता.

    बॉलिवूडमधील सदमा, नागिन, निगाहें, मिस्टर इंडिया, चालबाज, लम्हे, खुदा गवाह, जुदाई अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून त्यांनी भूमिका साकारल्या. याचबरोबर, त्यांनी हिंदी चित्रपटांसह तमीळ, तेलगू, मल्याळम, कन्नड चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले. जवळपास ३०० चित्रपटांमध्ये काम केले.

     निर्माते, दिग्दर्शक बोनी कपूर यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्यानंतर जुदाई चित्रपटाचा अपवाद वगळता श्रीदेवी चित्रपटसृष्टीपासून दूर होत्या. त्यानंतर सहा वर्षानंतर श्रीदेवी यांनी मिसेस मालिनी अय्यर या मालिकेतून छोट्या पडद्यावर एंट्री केली. त्यानंतर २०१२ साली आलेल्या 'इंग्लिश-विंग्लिश' या चित्रपटातून श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले.

     अभिनेत्री श्रीदेवीचा दुबईमध्ये ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे, ती ५४ वर्षांची होती. तिला आलेला ह्रदयविकाराचा झटका इतका तीव्र होता की तिला रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. श्रीदेवी तिचा नवरा बोनी कपूर आणि लहान मुलगी 'खुशी' सोबत दुबईला मोहीत मारवाह याच्या लग्न समारंभासाठी गेली होती.
बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचे शनिवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने दुबईत निधन झाले. त्यांच्या पश्चात पती बोनी कपूर आणि दोन मुली असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनामुळे बॉलिवूड आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली 

No comments:

Post a Comment

जर्मन भाषा शिकण्याची शिक्षकांना सुवर्ण संधी

  जर्मन भाषा शिकण्याची आवड असणाऱ्या व सध्या नियुक्तीच्या जिल्ह्यात जर्मन भाषा शिकवण्याचे शालेय शिक्षण विभागामार्फत आयोजित वर्ग घेण्यास इच्छु...