शब्दांनीच शिकवलय पडता पडता सावरायला,
शब्दांनीच शिकवलय रडता रडता हसायला.
शब्दांमुऴेच होतो एखाद्याचा घात आणि
शब्दांमुऴेच मिऴते एखाद्याची आयुष्यभर साथ.
शब्दांमुऴेच जुऴतात मनामनाच्या तारा आणि
शब्दांमुऴेच चढतो एखाद्याचा पारा.
शब्दच जपुन ठेवतात त्या गोड आठवणी
आणि शब्दांमुऴेच तरऴते कधीतरी डोऴ्यात पाणी...
"म्हणूनच जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल".