Pages

www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग ला भेट देणाऱ्या सर्व शिक्षकांचे मी श्री शंकर भालेराव सहर्ष स्वागत करीत आहे. www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग वर असणारी माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे.जर यातून कुणाच्या copyright हक्क कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कृपया मला shankarbhalerao9@gmail.com तात्काळ मेल वर कळवावे सदर पोस्ट अथवा कॉपिरराईट भाग ताबडतोब ब्लॉग वरून काढून टाकला जाईल
Showing posts with label लाडकी बहिण योजना ३ हजार आले का ?. Show all posts
Showing posts with label लाडकी बहिण योजना ३ हजार आले का ?. Show all posts

Thursday, August 15, 2024

लाडकी बहिण योजना ३ हजार आले का ?

 लाडकी बहिण योजना ३ हजार आले का ?

जर तुम्हाला या योजनेचा लाभ अद्यापही मिळाला नसेल म्हणजेच तुम्हाला या योजने अंतर्गत ३ हजार रुपये मिळाले नसेल तर यासाठी काय करावे लागणार आहे ही संपूर्ण प्रक्रिया आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यामुळे माहिती शेवटापर्यंत नक्की वाचा.

दिनांक १४ ऑगस्ट पासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ३ हजार रुपये वितरीत करण्यात आलेले आहे. हे पैसे १७ तारखेपर्यंत वितरीत करण्यात येणार आहे त्यामुळे जर तुम्हाला हे पैसे मिळाले नसेल तर तुम्हाला वाट बघावी लागणार आहे.

यामध्ये खूप महिला लाभार्थी वंचित राहिलेल्या आहे. याचे मुख्य कारण म्हणजे वंचित राहिलेल्या महिलांचे आधार कार्ड हे त्यांच्या बँक खात्याशी डीबीटी द्वारे लिंक केलेले नाही. यामध्ये २७ लाख महिलांचे आधार त्यांचा बँक खात्याशी लिंक केलेले नाही.

ज्या लाभार्थ्यांचे आधार लिंक नाही त्यांना मेसेज द्वारे सुद्धा कळविण्यात आलेले आहे. 

जर तुम्हाला या योजनेचा लाभ हवा असेल तर यासाठी सर्वात पहिले तुम्हाला आधार कार्ड हे डीबीटी द्वारे तुमच्या बँक खात्याशी लिंक करावे लागणार आहे. बऱ्याच लाभार्थ्यांना हा गैरसमज आहे की त्याचे आधार हे लिंक आहे परंतु ते डीबीटी द्वारे लिंक करण्यात आलेले नाही.

डीबीटी द्वारे आधार कार्ड बँक खात्याला ऑनलाईन पद्धतीने कसे लिंक करायचे याची प्रक्रिया कशी आहे ही संपूर्ण माहिती आपण याठिकाणी जाणून घेणार आहोत त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.

लाडकी बहिण योजना आधार लिंक आहे का तपासा

ही माहिती तपासण्यासाठी तुम्हाला myaadhar.uidai.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला जायचे आहे आणि तुमचा आधार क्रमांक टाकून याठिकाणी लॉगीन करायचे आहे. तुम्ही जो मोबाईल क्रमांक तुमच्या आधार ला लिंक केलेला आहे त्यावर एक otp पाठविण्यात येईल तो otp या ठिकाणी टाका.

लॉगीन झाल्यानंतर तुम्हाला याठिकाणी भरपूर पर्याय दिसेल त्यापैकी bank seeding status या पर्यायावर क्लिक करा. आता तुम्हाला याठिकाणी ही संपूर्ण माहिती दाखविण्यात येईल तुमचे आधार हे बँक खात्याशी dbt द्वारे लिंक आहे किंवा नाही.

तुमच्या कोणत्या बँक ला ही आधार लिंक आहे आणि या बँक चे नाव व त्यासमोर active असेल तर तुमचे पैसे हे १७ तारखेपर्यंत तुम्हाला मिळून जीईल.

जर तुमचे कोणतेही बँक खाते आधार लिंक नसेल तर तुम्हाला पोस्ट बँक मध्ये खाते उघडावे लागणार आहे. तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल.

जर्मन भाषा शिकण्याची शिक्षकांना सुवर्ण संधी

  जर्मन भाषा शिकण्याची आवड असणाऱ्या व सध्या नियुक्तीच्या जिल्ह्यात जर्मन भाषा शिकवण्याचे शालेय शिक्षण विभागामार्फत आयोजित वर्ग घेण्यास इच्छु...