https://play.google.com/store/apps/details?id=com.MergeCube.TheSolarSyste
User Guide/Manual💐
https://drive.google.com/file/d/10c6El7K32fwu1lf_LXVqlfyXLpQmcqEA/view?usp=drivesdk
_काय आहे MERGE CUBE_
*मर्ज क्यूब म्हणजे एक कोडेड चौकोनी ठोकळा असून त्यावरील बाजू विविध अँपद्वारे डिव्हाईस च्या माध्यमातून स्कॅन करून त्यांना मर्ज करून विद्यार्थ्यांना व्हर्च्युयल (आभासी)प्रत्यक्ष अनुभव देता येतो. असे क्यूब ऑनलाईन विकत मिळतात तसेच,त्यात विश्वातील विविध नैसर्गिक रचना,गेम,स्थळ,मानवी संस्था,विज्ञानातील प्रयोग असे घटक अनुभवायला मिळतात,या क्यूब द्वारे एखादी कठीण संकल्पना सहज समजण्यास मदत होते, वेगवेगळ्या साइड वर आपणास हे क्यूब बघायला मिळतात,कॉपी राईट कायद्याच्या अधीन राहून आपण हे क्यूब कॉपी करू शकत नाही. डेमो म्हणून किंवा जाहिरात म्हणून काही साईड असे क्यूब फ्री मध्ये देत असतात.त्यातलाच Solor System हा क्यूब सध्या राज्यभर विद्यार्थ्यांना आभासी सुर्यमालेचा आनंद देत आहे.*
_सूर्यमाला अनुभव_
क्यूब द्वारे दिसणारी ही सूर्यमाला आभासी असून इंटरऍक्टिव्ह आहे. विद्यार्थी प्रत्येक ग्रहला स्पर्श करून माहिती जाणून घेतली.सोबतच प्रत्येक ग्रहाला संगीत दिलेले असल्याने सूर्यमालेतील पृथ्वी,मंगळ,बुध,गुरू,शनी,युरेनस,नेपच्यून या ग्रहांचा अभ्यास करतांना विद्यार्थ्यांना अतिशय आनंद होतोय. प्रत्येक ग्रहाची इंग्रजीत माहितीही दिलेली आहे, खगोलशास्राविषयी विद्यार्थ्यांना नेहमीच कुतूहल असते या क्युबच्या माध्यमातून जणूकाही विद्यार्थी संपूर्ण आभासी ग्रहमाला स्वतः च्या हातात घेऊन सर्व ग्रहांचा अभ्यास करू शकतो या अनुभवामुळे विदयार्थ्यांना खगोलशास्त्रविषयी गोडी निर्माण होईल, अश्या कोडेड क्यूब ला मर्ज करून विश्वातील नैसर्गिक रचनांचा अभ्यास करणे शक्य होईल.नुकत्याच झालेल्या राज्य शिक्षण परिषदेत या पद्धतीचा वापराविषयी माहिती देण्यात आली.
धन्यवाद श्री.सुनील बडगुजर सर