इयत्ता ५ वी व ८ वी शिष्यवृत्ती परिक्षा आवेदनपत्र ( Hall ticket ) वेबसाईट वर उपलब्ध झाल्याबाबत.
इयत्ता ५ वी व ८ वी साठी १८ फेब्रुवारी रोजी शिष्यवृत्ती परिक्षा होणार आहे .
त्यासाठी विद्यार्थी परिक्षा आवेदनपत्र / प्रवेशपञ website वर उपलब्ध झालेले आहेत.
आवेदनपञ कसे मिळवावे
या webside ला भेट दया
🎓यानंतर school login करून विद्यार्थी यादी ओपन होईल.
🎓विद्यार्थ्यांच्या नावापुढे Admit card पर्याय आहे .
त्याला click केल्यावर परिक्षा आवेदनपत्र ओपन होईल.
🎓त्यामध्ये वरील बाजूस print option आहे.
🎓त्याला click करून print काढावी
*विद्यार्थ्यांसाठी व शाळेसाठी सुचना.*
.............................................
*परीक्षार्थ्यांसाठी.*
.............................................
सूचना :-
🎓1) परीक्षार्थ्याने प्रत्येक पेपर सुरु होण्यापूर्वी ३० मिनिटे अगोदर परीक्षागृहात प्रवेशपत्रासह उपस्थित रहावे.
🎓2) उत्तरे नोंदविण्यास Gसुरवात करण्यापूर्वी उत्तरपत्रिकेवर आणि प्रश्नपत्रिकेच्या मुखपृष्ठावर छापलेल्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात.
🎓3) उत्तरपत्रिकेवर आणि स्वाक्षरीपटावर विहित ठिकाणी प्रत्येक पेपरच्या वेळी परीक्षार्थ्याने स्वाक्षरी करावी.
🎓4) प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत इतर परीक्षार्थी, पर्यवेक्षक, केंद्रसंचालक यांचेशी पेपर चालू असताना चर्चा करू नये._
🎓5) कॅलक्युलेटर, मोबाईल, पुस्तके, इ. साहित्य परीक्षागृहात आणण्यास सक्त मनाई आहे.
🎓6) उत्तरे नोंदविण्यासाठी निळ्या किंवा काळ्या शाईच्या बॉलपेनचाच वापर करावा.
🎓7) परीक्षार्थ्यास कार्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात येणार आहे. पेपर संपल्यानंतर उत्तरपत्रिकेची Original Copy पर्यवेक्षकाकडे जमा करून उत्तरपत्रिकेची Candidate Copy व प्रश्नपत्रिका आपल्या सोबत घेऊन जाण्यास परीक्षार्थ्यास परवानगी आहे.
🎓8) कार्बनलेस उत्तरपत्रिकेवरील बैठक क्रमांकाच्या रकान्यात परीक्षार्थ्याचा बैठक क्रमांक छापण्यात आलेला नाही. तथापि उत्तरपत्रिकेवरील बारकोड क्रमांक हाच त्याचा बैठक क्रमांक आहे.
🎓9) उत्तरपत्रिकेवर परीक्षार्थ्याचा बैठक क्रमांक, माध्यम, सेमी इंग्रजी व प्रश्नपत्रिका संचकोड अचूकपणे नोंदवून Gत्याबाबतची वर्तुळे अचूकपणे रंगविणे आवश्यक आहे.
🎓10) उत्तरपत्रिका संगणकावर _तपासली जाणार असल्याने ती फाटणार नाही चुरगळणार नाही याची दक्षता घ्यावी.
🎓11) उत्तरपत्रिका फाटल्यामुळे उत्तरपत्रिकेवर रंगविलेले पर्याय दिसत नसल्यास त्या प्रश्नांचे गुण दिले जाणार नाहीत.
🌹 *शाळा व पालकांसाठी सूचना* :-
................................................
🌹1) परीक्षेपूर्वी परीक्षार्थ्यांकडून प्रश्नपत्रिका सोडविण्याचा पुरेसा सराव करून घ्यावा.
🎓2)प्रश्नपत्रिकेत त्रुटी/चुका _आढळून आल्यास त्याबाबतचे निवेदन लेखी स्वरुपात न पाठवता संबंधित शाळेच्या लॉगीनमधून तात्पुरती उत्तरसूची संकेतस्थळावर प्रसिध्द झाल्यानंतर विहित मुदतीत ऑनलाईन पद्धतीनेच करावे.
🌹3) परीक्षेनंतर निकालाच्या कार्यवाहीचे टप्पे
अंतरिम उत्तरसूची प्रसिध्द करणे आक्षेप मागवून अंतिम उत्तरसूची घोषित करणे अंतरिम (तात्पुरता) निकाल घोषित करणे त्यावर आक्षेप मागवून अंतिम निकाल व गुणवत्ता यादी घोषित करणे.
🎓4)परीक्षा परिषदेच्या www.puppss.mscescholarshipexam.in या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द केलेली माहिती व सूचना नियमितपणे काळजीपूर्वक वाचाव्यात.
🌹5) अनावश्यक पत्रव्यवहार अथवा अनावश्यक ईमेल्स परिषदेस पाठवू नयेत.
🎓6 ) परीक्षेच्या अंतिम निकालापर्यंत प्रवेशपत्र जतन करून ठेवावे.
फक्त माहितीस्तव