Pages

www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग ला भेट देणाऱ्या सर्व शिक्षकांचे मी श्री शंकर भालेराव सहर्ष स्वागत करीत आहे. www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग वर असणारी माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे.जर यातून कुणाच्या copyright हक्क कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कृपया मला shankarbhalerao9@gmail.com तात्काळ मेल वर कळवावे सदर पोस्ट अथवा कॉपिरराईट भाग ताबडतोब ब्लॉग वरून काढून टाकला जाईल
Showing posts with label EPF Information. Show all posts
Showing posts with label EPF Information. Show all posts

Thursday, December 14, 2017

EPF Information

👉 _पीएफ बॅलन्स जाणून घेण्याचे पर्याय

पीएफच्या नावावर तुमच्या पगारातून दर महिन्याला किती रक्कम कापली जात आहे हे आता तुम्ही अवघ्या काही मिनिटात जाणून घेऊ शकता. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफओ) ने यासाठी पेपरलेस सुविधा बनविली आहे. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात...

1) आपण ईपीएफओ पोर्टलला भेट देऊन आपला पीएफ बॅलन्स चेक करू शकतो. त्यासाठी तुम्हाला
EPF Websites
या संकेतस्थळावर जावे लागेल. येथे आपण 'Our Services' वर जा आणि 'For Employees' वर क्लिक करा त्यानंतर उघडलेल्या पृष्ठावर आपल्याला पासबुक पर्याय निवडावा लागेल.

पण हे करताना एक लक्षात ठेवा की, जर तुमचा यूएएन नंबर सक्रिय असेल आणि त्यानंतर तो तुमच्या पीएफ खात्याशी लिंक केला असेल तरच हे शक्य होणार आहे. नवीन पृष्ठ उघडल्यास तुम्हाला आपला यूएएन नंबर आणि पासवर्ड येथे प्रविष्ट करावा लागेल आणि मग तुम्हाला तुमच्या खात्यात शिल्लक असलेल्या रक्कमेची माहिती मिळेल.

2) तुम्ही मोबाइलद्वारे देखील पीएफ बॅलन्स जाणून घेऊ शकता. यासाठी तुम्ही m-epf हे अॅप डाउनलोड करू शकता. याशिवाय, आता तुम्ही UMANG अॅपद्वारे आपल्या पीएफ शिल्लक विषयी माहिती मिळवू शकता.

यासाठी आपल्याला अॅपवरील सदस्यावर क्लिक करावे लागेल. यानंतर, आपल्याला बॅलेन्स / पासबुकवर क्लिक करणे आवश्यक आहे. यानंतर तुम्हाला तुमचा यूएएन नंबर आणि मोबाईल नंबर प्रविष्ट करावा लागेल. आपण ही महत्वपूर्ण माहिती भरताच, तुमच्या समोर तुम्हाला पीएफमध्ये जमा रक्कमेचा तपशील मिळेल.

3) आपण मिस्ड कॉल देऊन आपल्या पीएफ खात्याची माहिती देखील घेऊ शकता. यासाठी 011-22901406 वर मिस्ड कॉल करावा लागेल. तुम्हाला त्यानंतर तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक माहिती मिळेल. तथापि, हे लक्षात ठेवा की हे कॉल आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरूनच केला पाहिजे. अन्य कोणत्याही मोबाईल नंबरवरून तुम्ही तुमच्या पीएफ खात्याची माहिती मिळवू शकत नाही.

4) SMS द्वारे देखील आपण पीएफ बॅलन्स जाणून घेऊ शकतो. ईपीएफओसोबत नोंदणीकृत नंबरवरून 7738299899 या नंबरवर मेसेज करावा लागेल. SMSचे एक निश्चित स्वरूप असून तुम्हाला यामध्ये EPFOHO UAN ENG लिहावे लागेल. शेवटचे तीन शब्द (ENG) म्हणजे भाषा. जर तुम्ही हे तीन शब्द वापरले तर आपल्याला उर्वरित माहिती इंग्रजीमध्ये मिळेल. तुम्ही हिंदी भाषा कोड प्रविष्ट केल्यास, तुम्हाला त्याच भाषेत माहिती दिली जाईल.

लक्षात ठेवा UAN च्या जागी तुम्हाला यूएएन नंबर टाकायचा नाही. फक्त UAN लिहून सोडून द्या. ईपीएफओशी जोडलेला आपल्या मोबाईल क्रमांकावर आपल्या पीएफ खात्याची आवश्यक माहिती मिळेल. त्यामुळे आपण नेहमीच नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून संदेश पाठवला पाहिजे.
सौजन्य: Whatsapp

जर्मन भाषा शिकण्याची शिक्षकांना सुवर्ण संधी

  जर्मन भाषा शिकण्याची आवड असणाऱ्या व सध्या नियुक्तीच्या जिल्ह्यात जर्मन भाषा शिकवण्याचे शालेय शिक्षण विभागामार्फत आयोजित वर्ग घेण्यास इच्छु...