Pages

www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग ला भेट देणाऱ्या सर्व शिक्षकांचे मी श्री शंकर भालेराव सहर्ष स्वागत करीत आहे. www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग वर असणारी माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे.जर यातून कुणाच्या copyright हक्क कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कृपया मला shankarbhalerao9@gmail.com तात्काळ मेल वर कळवावे सदर पोस्ट अथवा कॉपिरराईट भाग ताबडतोब ब्लॉग वरून काढून टाकला जाईल

Friday, August 23, 2024

शाळास्तर सखी सावित्री समिती रचना व कार्यें

शासन परिपत्रक(शाळास्तर सखी सावित्री समिती)

राज्यातील सर्व शाळांमध्ये मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी व निकोप समतामुलक वातावरण निर्मितीसाठी शासन स्तरावरून विविध स्तरावर सखी सावित्री समितीचे गठन करण्यात येत आहे.

शाळास्तर सखी सावित्री समिती


शाळास्तर सखी सावित्री समितीची कार्ये -

१) आपल्या कार्यक्षेत्रातील १००% मुला मुलींची (दिव्यांग विद्यार्थी) पटनोंदणी व १००% उपस्थिती साध्य करण्यासाठी गावातील प्रत्येक घरी शिक्षकांनी/बालरक्षकांनी भेट देऊन विद्यार्थ्यांची नावनोंदणी करणे.

२) स्थलांतरीत पालकांच्या व शाळाबाहेर असलेल्या सर्व मुला-मुलींना सर्वेक्षणाच्या माध्यमातून शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात दाखल करणे.

३) विद्यार्थ्यांच्या भावनिक, शारीरिक व बौध्दीक विकासासाठी तसेच ताणतणाव मुक्तीसाठी मुला मुलींचे व त्यांच्या पालकांचे समुपदेशन करणे, सजग पालकत्वासाठी कार्यशाळा आयोजित करणे. ४) मुला-मुलींच्या शिक्षणासाठी असणा-या शासकीय योजनांची माहिती देऊन प्रभावी अंमलबजावणीसाठी कार्यवाही करणे.

५) मुला-मुलींना करियर संबंधी मार्गदर्शन करणे, कौशल्य विकसनासाठी विविध उपक्रम राबविणे, मुलींच्या स्वसरंक्षणासाठी स्वतंत्र प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करणे.

६) मुला-मुलींसोबत आरोग्यदायी सवयीसाठी संवाद साधणे आणि निरोगी जीवनासाठी स्थनिक डॉक्टरांच्या सहकार्याने आरोग्य शिबीर, समुपदेशन यांसारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करणे. ७) आपल्या कार्यक्षेत्रातील बालविवाह रोखून, बालविवाहाचे होणारे दुष्परिणाम व बालविवाहाविषयी विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये जनजागृती निर्माण करणे व मुलींचे शिक्षण सुरु राहण्यासाठी प्रयत्न करणे.

८) व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (CSR) च्या माध्यमातून सामाजिक, भौगोलिक व आर्थिकदृष्टया दुर्बल व वंचित घटकातील मुला-मुलींच्या शिक्षणासाठी मदत करणे.

९) विविध कारणांमुळे मुला-मुलींचा होणारा अध्ययन -हास कमी करण्यासाठी उपाययोजना करण

१०) शाळेत समतामुलक वातावरण राहिल यासाठी लिंगभेदविरहित व समावेशक उपक्रम राबवणे. विद्यार्थी-विद्यार्थिनी कोणत्याही अत्याचाराला बळी पडणार नाहीत अशी निकोप वातावरण निर्मिती करणे. अपवादात्मक परिस्थितीत असे घडल्यास तक्रार दाखल करण्याबाबत लैगिक गुन्हयांपासून बालकांचे संरक्षण कायदा (Pocsco) अंतर्गत असलेल्या "ई-बॉक्स" या राष्ट्रीय बाल अधिकारी संरक्षण आयोगाने तयार केलेल्या सुविधेबाबतची माहिती तसेच महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने तयार केलेल्या 'CHIRAG' या अॅपची माहिती व चाइल्ड हेल्पलाइन नंबर ( १०९८) बाबत सूचना फलक शाळेत लावले जातील याची खात्री करणे.

११) समितीच्या महिन्यातून १ वेळा (आवश्यकता भासल्यास अधिक वेळा) बैठका आयोजित कराव्यात. सदर बैठका शाळेत घेण्यात याव्यात, जेणे करुन मुलामुलींचे प्रतीनिधी उपस्थित राहू शकतील.

१२) शाळास्तर समिती बैठकाचा अहवाल प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत शाळास्तर समितीसमोर शाळेतील कोणत्याही स्तरावर मुलींच्या शिक्षणाबाबत व इतर समस्याबाबत निर्माण झालेल्या अडचणी शाळास्तर समितीमध्ये समजू शकतील व त्यावर तातडीने निर्णय घेणे शक्य होईल. १३) सदर समित्यांचे फलक शाळेच्या/कार्यालयाच्या दर्शनी भागावर लावावेत.



Thursday, August 22, 2024

महावाचन उत्सव 2024

 महावाचन उस्तव २०२४ अंतर्गत शाळेची नोंदणी व लॉगिन माहिती लिंक उपलब्ध ! सविस्तर जाणून घ्या.

➤ शाळेची नोंदणी 

महावाचन उत्सव

वरील वेब पोर्टल वर महा वाचन उस्तव २०२४ अंतर्गत आपल्याला

याकरिता 

1. शाळांनी त्यावर लॉगिन करून आपली प्राथमिक माहिती भरावी. 

2. यात शाळांनी आपले user id तयार करायचा आहे. 

3. त्या युजर id आपले विद्यार्थ्याची माहिती अपलोड करायचा आहे. त्यामुळे शाळांनी आपला युजर आयडी नीट तयार करावयाचा आहे. तसेच त्यांचा पासवर्ड ही लक्षात ठेवायचं आहे. 

4. तालुका, जिल्हा, विभागीय, तसेच राज्यस्तर असे रिपोर्ट तयार होतील. त्यावरून आपल्या अधिनास्त कोण किती काम झाले याचा मागोवा घेऊन आपले काम करता पूर्ण करता येईल.

➤ मुख्याध्यापक माहिती


➤ शाळेची माहिती


➤ नवीन पासवर्ड तयार करा


➤ विद्यार्थ्यांची माहिती व पूस्तक वाचन माहिती भरा 


❇️ संपूर्ण माहिती एकाच ठिकाणी

तालुका, जिल्हा, विभागीय, तसेच राज्यस्तर असे रिपोर्ट तयार होतील.


मुंबई महानगरपालिका लिपिक भरती 2024


 बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2024 


 मार्गदर्शन पर व्हिडिओ 
 बृहन्मुंबई महानगरपालिका भरती ऑनलाइन फॉर्म कसा भरावा याची सविस्तर माहिती खालील व्हिडिओ पहा.



 

Thursday, August 15, 2024

लाडकी बहिण योजना ३ हजार आले का ?

 लाडकी बहिण योजना ३ हजार आले का ?

जर तुम्हाला या योजनेचा लाभ अद्यापही मिळाला नसेल म्हणजेच तुम्हाला या योजने अंतर्गत ३ हजार रुपये मिळाले नसेल तर यासाठी काय करावे लागणार आहे ही संपूर्ण प्रक्रिया आपण या ठिकाणी बघणार आहोत त्यामुळे माहिती शेवटापर्यंत नक्की वाचा.

दिनांक १४ ऑगस्ट पासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ३ हजार रुपये वितरीत करण्यात आलेले आहे. हे पैसे १७ तारखेपर्यंत वितरीत करण्यात येणार आहे त्यामुळे जर तुम्हाला हे पैसे मिळाले नसेल तर तुम्हाला वाट बघावी लागणार आहे.

यामध्ये खूप महिला लाभार्थी वंचित राहिलेल्या आहे. याचे मुख्य कारण म्हणजे वंचित राहिलेल्या महिलांचे आधार कार्ड हे त्यांच्या बँक खात्याशी डीबीटी द्वारे लिंक केलेले नाही. यामध्ये २७ लाख महिलांचे आधार त्यांचा बँक खात्याशी लिंक केलेले नाही.

ज्या लाभार्थ्यांचे आधार लिंक नाही त्यांना मेसेज द्वारे सुद्धा कळविण्यात आलेले आहे. 

जर तुम्हाला या योजनेचा लाभ हवा असेल तर यासाठी सर्वात पहिले तुम्हाला आधार कार्ड हे डीबीटी द्वारे तुमच्या बँक खात्याशी लिंक करावे लागणार आहे. बऱ्याच लाभार्थ्यांना हा गैरसमज आहे की त्याचे आधार हे लिंक आहे परंतु ते डीबीटी द्वारे लिंक करण्यात आलेले नाही.

डीबीटी द्वारे आधार कार्ड बँक खात्याला ऑनलाईन पद्धतीने कसे लिंक करायचे याची प्रक्रिया कशी आहे ही संपूर्ण माहिती आपण याठिकाणी जाणून घेणार आहोत त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा.

लाडकी बहिण योजना आधार लिंक आहे का तपासा

ही माहिती तपासण्यासाठी तुम्हाला myaadhar.uidai.gov.in या वेबसाईटवर तुम्हाला जायचे आहे आणि तुमचा आधार क्रमांक टाकून याठिकाणी लॉगीन करायचे आहे. तुम्ही जो मोबाईल क्रमांक तुमच्या आधार ला लिंक केलेला आहे त्यावर एक otp पाठविण्यात येईल तो otp या ठिकाणी टाका.

लॉगीन झाल्यानंतर तुम्हाला याठिकाणी भरपूर पर्याय दिसेल त्यापैकी bank seeding status या पर्यायावर क्लिक करा. आता तुम्हाला याठिकाणी ही संपूर्ण माहिती दाखविण्यात येईल तुमचे आधार हे बँक खात्याशी dbt द्वारे लिंक आहे किंवा नाही.

तुमच्या कोणत्या बँक ला ही आधार लिंक आहे आणि या बँक चे नाव व त्यासमोर active असेल तर तुमचे पैसे हे १७ तारखेपर्यंत तुम्हाला मिळून जीईल.

जर तुमचे कोणतेही बँक खाते आधार लिंक नसेल तर तुम्हाला पोस्ट बँक मध्ये खाते उघडावे लागणार आहे. तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल.

Tuesday, August 13, 2024

शालेय व्यवस्थापन समिती सभा माहेवार

 शाळा व्यवस्थापन समिती सभा माहेवर विषय व ठराव !  उपयुक्त माहिती सविस्तर वाचा 




मुख्याध्यापक व प्रशिक्षण करिता उपयुक्त माहिती

शालेय व्यवस्थापन समिती सभा माहेवार

Friday, August 18, 2023

पायाभूत चाचणी गुणदाण तक्ते 2023

पायाभूत चाचणी गुणदाण तक्ते 2023-24

इयत्ता तिसरी ते आठवीसाठी चे सर्व विषयांचे गुणांचे संकलन तक्ते एक्सएल स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.






Sunday, July 30, 2023

Student New Entry(2023-2024)

 💥 Student New Entry💥

      (2023-2024)

🔹 इयत्ता पहिलीसाठी स्टुडंट पोर्टलला ऑनलाईन NEW Entry नोंदणी सुरू

🔸 Student पोर्टल मध्ये इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांची नोंदणी कशी करावी ?

🔹 *मार्गदर्शिका व कच्चा नमुनाही उपलब्ध

(  ठळक अक्षरात,सविस्तरपणे स्टेप बाय स्टेप, स्क्रिन शॉट सह जाणून घ्या..) 👇🏼

STUDENT ENTRY


सौजन्य -https://www.pkguruji.com/2022/06/Student-New-Itry.html

Saturday, July 29, 2023

सातवी सर्व ऑनलाईन टेस्ट

इयत्ता सातवी गणित सेमी सर्व ऑनलाइन टेस्ट साठी खालील लिंक वर क्लीक करा.

सातवी सर्व ऑनलाईन टेस्ट

इयत्ता आठवी गणित सेमी सर्व ऑनलाइन टेस्ट साठी खालील लिंक वर क्लीक करा.

इयत्ता 8 वी सर्व विषय ऑनलाईन टेस्ट

Thursday, July 27, 2023

सेतू अभ्यास उत्तर चाचणी

सेतू उत्तर चाचणी 2023

इयत्ता 2 री ते 10 वी पूर्व व उत्तर चाचणी  डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
सेमी उत्तर चाचणी साठी खालील लिंक वर क्लिक करा.
सेतू अभ्यास मराठी माध्यम उत्तर चाचणी साठी क्लिक करा



सौजन्य - Teacher 4u Blog
                 Spardha ASB Blog
               https://maa.ac.in
     https://www.pradipjadhao.com/2023/07/Setu-Abhyaas-Bridge-Course-2023-Semi-English-Post-Test-Maths-Uttar-.html?m=1

जर्मन भाषा शिकण्याची शिक्षकांना सुवर्ण संधी

  जर्मन भाषा शिकण्याची आवड असणाऱ्या व सध्या नियुक्तीच्या जिल्ह्यात जर्मन भाषा शिकवण्याचे शालेय शिक्षण विभागामार्फत आयोजित वर्ग घेण्यास इच्छु...