Pages

www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग ला भेट देणाऱ्या सर्व शिक्षकांचे मी श्री शंकर भालेराव सहर्ष स्वागत करीत आहे. www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग वर असणारी माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे.जर यातून कुणाच्या copyright हक्क कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कृपया मला shankarbhalerao9@gmail.com तात्काळ मेल वर कळवावे सदर पोस्ट अथवा कॉपिरराईट भाग ताबडतोब ब्लॉग वरून काढून टाकला जाईल

Sunday, January 6, 2019

शाळासिद्धि कार्यक्रम विशेष

✒🌹✒ शाळासिद्धि कार्यक्रम विशेष सत्र २०१८ - २०१९ साठी शाळासिद्धी अंतर्गत शाळांचे स्वयंमूल्यमापन ऑनलाइन करण्याबाबत ✒🌹✒ महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या २४ डिसेंबर २०१८ रोजी च्या पत्रान्वये सत्र २०१८ - २०१९ साठी राज्यातील सर्व प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांनी आपले मूल्यांकन व प्रमाणीकीकरण करणे व शाळांची गुणवत्ता आश्वासित करणे गरजेचे आहे . तसेच शैक्षणिक , भौतिक व संस्थात्मक गुणवत्तावाढीच्या उद्देशाने राज्य शासनाने राष्ट्रीय पातळीवरील शालासिद्धी हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्यामध्ये समृद्ध शाळा नावाने सुरू केलेला आहे . उपरोक्त शासन निर्देशानुसार प्रत्येक शाळेने दरवर्षी शाळांचे स्वयंमूल्यमापन करणे अपेक्षित आहे . सत्र २०१८-२०१९ साठी ३० जानेवारी २०१९ पर्यंत शाळा सिद्धि चे स्वयंमूल्यमापन करणे गरजेचे आहे . त्यासाठी www.shaalasiddhi.nuepa.org या न्यूपा नवी दिल्लीच्या वेबपोर्टलवर आपल्या शाळेचे स्वयंमूल्यमापन करणे गरजेचे आहे . आपल्या अकोला जिल्ह्याचे कार्य देशात सर्वोत्तम असावे यासाठी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांनी त्वरित लॉगिन होऊन उपरोक्त वेबपोर्टलवर आपले स्वयंमूल्यमापन त्वरित करावे व त्याची माहिती पंचायत समिती मध्ये मा. गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे द्यावी . 🌹 _स्वयंमूल्यमापन ३० जानेवारी २०१९ पूर्वी करावे_ 🌹 ✒🌹✒ *शाळा सिद्धि स्वयंमूल्यमापन करण्याची कार्यपद्धती* माहितीचे प्रत्यक्ष खालील चार टप्पे आहेत 🌹 शाळेतील संपूर्ण विद्यार्थ्यांची माहिती. 🌹 शाळेतील संपूर्ण शिक्षकांची माहिती. 🌹 ७ क्षेत्र म्हणजे 46 गाभा माणके 🌹 प्रत्येक गाभा मानकानुसार त्या त्या स्तरांमध्ये सुधारणेचे नियोजन. माहिती भरण्यापूर्वी काही महत्त्वपूर्ण बाबी लक्षात घ्याव्या जातवार पटसंख्या - _३० सप्टेंबर २०१८ ची अपेक्षित आहे._ वार्षिक उपस्थिती _सत्र २०१७ - २०१८ ची अपेक्षित आहे._ *मुख्य विषय संपादणुक* - _इयत्ता आठवी ते बारावीची मागील ( २०१७ - २०१८ )शैक्षणिक वर्षाची लिहावी_ सत्र २०१७-२०१८ चा निकाल- _इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या निकाल *टक्केवारीत* लिहावा._ शिक्षक संख्या - ३० सप्टेंबर २०१८ नुसार किंवा प्रत्यक्ष वाढलेली असल्यास ती नोंदवावी. शिक्षकांच्या रजा - _१ जानेवारी २०१८ ते ३१ डिसेंबर २०१८ - या कालावधीत रजा घेतलेल्या शिक्षकांची संख्या लिहित असतांना ते सलग एक आठवडा , एक महिना किंवा त्यापेक्षा जास्त रजेवर असतील तोच कालावधी गृहीत धरावा._ स्तर निश्चिती- _पुस्तिकेमध्ये दिल्याप्रमाणे आपण कुठल्या स्तरांमध्ये आहोत याची खात्री करूनच सुयोग्य स्तर निश्चित करावा_ सुधारणेचे नियोजन* - _गाभा मानकाचा अध्ययन स्तर तीन पेक्षा कमी असेल तर त्यासाठी आपण काय सुधारणा करणार आहोत याचे नियोजन आपण स्वतःसाठी करणे गरजेचे आहे. ते ॲक्शन प्लॅन मध्ये लिहावे._ 🌹 *प्रत्येक शाळेचे आपले घोषवाक्य निश्चित कलेले असावे. ते प्रत्येक वेळी बदलू नये* 🌹 *स्तर एकला १ गुण , स्तर दोनला २ गुण , स्तर तीनला ३ गुण अशाप्रकारे सातही क्षेत्राचे संकलन करून गुण ठरवावे* _महत्वाचे :- पहिल्या क्षेत्रामध्ये मध्ये दोन भाग असुन पहील्या भागात उपलब्धता व पर्याप्तता हा भाग आहे . दुसरा भाग उपयुक्तता व गुणवत्ता यामध्येच प्राप्त असलेल्या स्तरांना गुणदान केले आहे._ _स्वयंमूल्यमापन ऑनलाईन केल्यानंतर आपल्या लाॉगिनमधुन *रिपोर्ट* या टॅब मधे जावून प्रिंट काढावी._ श्रेणी आपण खालील प्रमाणे काढावी. श्रेणी "अ" :- ११२ ते १३८ गुण श्रेणी "ब" :- ६९ ते १११ गुण श्रेणी "क" :- _६८ किंवा पेक्षा कमी गुण_ 🌹 स्वयं मूल्यमापनासाठी आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🌹 प्रशांत शेवतकर _ळासिद्धि राज्य प्रशिक्षक , सुलभक व निर्धारक_ 📲 9637046140

No comments:

Post a Comment

जर्मन भाषा शिकण्याची शिक्षकांना सुवर्ण संधी

  जर्मन भाषा शिकण्याची आवड असणाऱ्या व सध्या नियुक्तीच्या जिल्ह्यात जर्मन भाषा शिकवण्याचे शालेय शिक्षण विभागामार्फत आयोजित वर्ग घेण्यास इच्छु...