Pages

www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग ला भेट देणाऱ्या सर्व शिक्षकांचे मी श्री शंकर भालेराव सहर्ष स्वागत करीत आहे. www.shankarbhalerao9.blogspot.in या ब्लॉग वर असणारी माहिती इंटरनेटवरून घेण्यात आली आहे.जर यातून कुणाच्या copyright हक्क कायद्याचे उल्लंघन होत असेल तर कृपया मला shankarbhalerao9@gmail.com तात्काळ मेल वर कळवावे सदर पोस्ट अथवा कॉपिरराईट भाग ताबडतोब ब्लॉग वरून काढून टाकला जाईल

Tuesday, May 2, 2017

शैक्षणिक PPT बनविणे .



1) प्रथम MS Office ओपन करुन POWER POINT ओपन करा.

2) तुम्हाला एक पांढरी स्लाईड दिसेल .स्लाईड डिझाइन हवी असल्यास स्क्रीनवर DESIGN या OPTION वर क्लिक करा तुम्हाला वेगवेगळे प्रकार दिसतील त्यातील एक निवडा.

3) स्लाईडवर 2 Text Box दिसतील.पहिल्या बॉक्समध्ये तुमच्या स्लाईड शो चा विषय व दुसऱ्या बॉक्समध्ये तुमचे नाव टाका.

 4) बॉक्स नको असेल तर बॉक्स रेषेवर RIGHT  क्लिक करुन कट करा.

  5)आता तुम्हाला स्लाईडवर फोटो टाकायचा असल्यास वरिल Insert वर क्लिक करा  PICTURE OPTION दिसेल त्यावर क्लिक करा नंतर तुमचे फोटो जेथे असतील ते फोल्डर ओपन करुन फोटो सिलेक्ट करा व खाली INSERT क्लिक करा फोटो स्लाईडवर येईल.

6)फोटोचे नाव किंवा विषय लिहिण्यासाठी वर INSERT ला क्लिक करा त्यात Text Box व Word Art सिलेक्ट करा व त्यात टाईप करा नंतर Text Box लेफ्ट की धरुन ठेऊन योग्य ठिकाणी सेट करा.

7) आता आपण साऊंड देऊ आता डाव्या बाजूला स्लाईड नं वर या आपण जे विषयाचे नाव लिहीले त्यावर क्लिक करा नंतर वर INSERT वर जाऊन SOUND वर क्लिक करा अथवा नावाखाली ARROW वर क्लिक करा तेथे काही OPTIONS येतील त्यातून नंबरचे OPTION निवडा त्यात अनेक प्रकार येतील त्यातून पाहिजे तो SOUND निवडा व क्लिक करा अशा प्रकारे तुम्ही स्लाईडवर ज्या ज्या गोष्टी अॅड केल्या त्या प्रत्येकाला साऊंड इफेक्ट देऊ शकता.

8) आता आपण अॅनिमेशन देऊ यासाठी पुन्हा स्लाईड एकवर जाऊन Text box सिलेक्ट करा नंतर वर Animations वर क्लिक करा त्याखाली डावीकडे CUSTOM ANIMATION असे OPTION दिसेल त्यावर क्लिक करा आता उजव्या बाजुला ADD EFFECT असे OPTION दिसेल त्यावर क्लिक करा त्यात 4 OPTION येतिल त्यातील पहिले सिलेक्ट करा पुन्हा त्यात अनेकOPTION दिसतील त्यातील हवे ते निवडा त्यातच खाली 3 OPTION दिसतीलSTART,DIRECTION,SPEED यातील प्रत्येक सिलेक्ट करुन सेट करा.

9)अशा प्रकारे प्रत्येक टेक्स्टलाअॅनिमेशन द्या अशा प्रकारे अनेक स्लाईड तयार करा यानंतर आपण स्लाईडला ANIMATIONदेऊ वर ANIMATION ला क्लिक केल्यावर तुम्हाला वर अनेक स्लाईड दिसतील त्यापैकी एक निवडा (जवळपास 60 आहेत)त्याच्याच शेजारी TRANSITION SOUND व SPEED असे दोन OPTION दिसतील त्या दोन्हीतील हवे ते TRANSITION निवडा त्याखालीच APPLY TO ALL असे OPTION दिसेल त्याला क्लिक केल्यास सर्व स्लाईडला ते TRANSITION लागू होईल स्लाईडच्या उजव्या बाजूला खाली PLAY असे OPTION आहे त्याला क्लिक केल्यास आपण जी स्लाईड केली ती बघता येईल सरावाने आपण चांगल्या PPT बनवू शकता अशा प्रकारे आपण आपला स्लाईड शो (PPTतयार करु शकता.

10)अशा प्रकारे आपण आपल्या विविध विषयांच्या शैक्षणिक PPT बनवून आपले अध्यापन अधिक दर्जेदार व परिणामकारक बनवू शकता .

No comments:

Post a Comment

जर्मन भाषा शिकण्याची शिक्षकांना सुवर्ण संधी

  जर्मन भाषा शिकण्याची आवड असणाऱ्या व सध्या नियुक्तीच्या जिल्ह्यात जर्मन भाषा शिकवण्याचे शालेय शिक्षण विभागामार्फत आयोजित वर्ग घेण्यास इच्छु...